फलटण चौफेर दि २१ जून २०२५
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनलला पाठिंबा दिला असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील गोखळी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात उभे असणाऱ्या निळकंठेश्वर पॅनलच्या कोपरा प्रचार सभेदरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राजे गटाचा पाठिंबा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जाहीर केला आहे.
माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक राज्यांमध्ये गाजत असताना फलटणच्या राजे गटाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने फलटण तालुक्यात मध्ये असणाऱ्या मतांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.
माळेगाव कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना फलटणच्या राजे गटाने दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार का ? असा प्रश्न सुद्धा फलटणच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जाऊ लागला आहे.